Header Ads Widget

50 रुपया मध्ये मिळवा ATM सारखे आधार कार्ड(Aadhaar Card) घरपोच | PVC Aadhaar Card Download


Aadhar card PVC Card


        आता आधार कार्ड चा वापर ओळख पत्र(ID CARD) सारखा होऊ लागला आहे. त्यामुळे आधार कार्ड आपल्या जवळ बाळगणे आवश्यक झाले आहे, परंतु बऱ्याच व्यक्ती कडे आधार कार्ड हे कागदावर कलर प्रिंट काढलेली असते जे की लवकरच खराब होऊ शकते. परंतु आता आपण ATM सारखे दिसणारे आधार कार्ड साठी अर्ज करू शकता.

 

# आपण घरपोच मिळणार आधार कार्ड

       आधार कार्ड देणाऱ्या विभाग UIDAI मार्फत त्यांच्या वेबसाईट www.uidai.gov.in वरून PVC कार्ड वरती प्रिंट केलेले आधार कार्ड बोलवू शकता ते पण घरूनच मोबईल किवा कॉम्पुटर वर अर्ज करून. आणि सदर कार्ड आपल्याला पोस्ट च्या स्पीड पोस्ट सेवे मार्फत लगेच दिलेल्या पत्या वर प्राप्त होईल.

 

# आधार PVC कार्ड चे फायदे व फी

       हे आधार बोलविण्या करिता आपणास 50/- फी भरावी लागेल. या आधार कार्ड ची गुणवत्ता चांगली असून लवकर खराब होणार नाही व आपण सहज आपल्या पर्स मध्ये ठेवू शकता. या कार्ड वरती होलोग्राम, Ghost Image, Micro Text, Guilloche Pattern व QR Code ज्याला स्कॅन करून आपण आधार कार्ड verify करू शकता.


# आधार PVC कार्ड करिता अर्ज कसा करावा

Step-1 : सर्व प्रथम mobile किवा computer च्या browser मध्ये (उदा. Google Chrome) www.uidai.gov.in वेबसाईट उघडावी.

PVC Aadhar acrd



Step-2 : वेबसाईट मध्ये "My Aadhaar" मेनू ला क्लिक करा त्यातील "Order Aadhaar PVC Card" पर्याय निवडा.

Aadhar card PVC



Step-3 : आपल्याला खालीलप्रमाणे पर्याय दिसतील त्यात आपला 12 अंकी आधार क्रमांक टाका तेसेच स्क्रीन दिसणारा Security Code टाईप करा व "Send OTP" बटन क्लिक करा. आपल्याला आधार सोबत जोडलेल्या मोबईल क्रमांक वरती OTP प्राप्त होईल.

Aadhar card PVC


Step-4 : खालील दाखाविल्या प्रमाणे आपणास प्राप्त सहा अंकी OTP enter करण्यासाठी रकाना दिसेल त्यात OTP type करावा, "Terms and Conditions" समोरील चेक बॉक्स tick करावा व "Submit" बटन वरती क्लिक करा.

Adhar card PVC


Step-5 : खालील दाखाविल्या प्रमाणे आपल्याला आपले आधार माहिती जसे फोटो, वय, पत्ता दिसेल खाली PVC कार्ड करिता फी भरण्यासाठी "Make Payment" बटन क्लिक करा.



Step-6 : आपण 50/- फी Net Banking, ATM Card/Debit Card, Credit Card, Google Pay,Phone Pay/Paytm मार्फत Pay करू शकता.

Step-7 : Payment यशस्वी झाल्या नंतर आपणास खाली दाखाविल्या प्रमाणे पावती Download होईल.


Step-8 : चार ते पाच दिवसात आपणास मोबईल वर आधार कार्ड Speed Post ने पाठविल्याचा पोस्टाचा Tracking ID असेला SMS प्राप्त होईल. सदर Tracking ID वापर करून आपण आपले आधार कार्ड status पोस्ट च्या वेबसाईट Track करू शकता. तसेच UIDAI  च्या वेबसाईट सुधा status Track करू शकता.


UIDAI status Track 

https://resident.uidai.gov.in/check-reprint-status


Post status Track

https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx












 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या